Maharashtra Rain Update :26 जुनला मान्सून मुंबईत सक्रिय होणार?48 तासात मान्सून मुंबईत सक्रिय होण्याची शक्यता
Continues below advertisement
राज्यात कालपासून पावसाला पुन्हा सुरुवात झालीय. आणि २९ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत मुंबईत मान्सून सक्रिय होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिलीय. म्हणजेच २६ जून रोजी मान्सून मुंबई दाखल होऊ शकेल. हा अंदाज खरा ठरल्यास आतापर्यंतचा सर्वात उशिरा मुंबईत दाखल होणारा मान्सून, अशी नोंद होईल. याआधी २०१९ मध्ये २५ जून रोजी मान्सून दाखल झाला होता.
Continues below advertisement