Maharashtra Rain Update: 18 ते 31 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता
Continues below advertisement
Maharashtra Rain Update: 18 ते 31 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात पावसाचा जोर ओसरल्याचं दिसून येतंय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाचा जोर कमी झाला होता. भारतीय हवामान विभागाकडून १८ ऑगस्टनंतर पुन्हा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. राज्यात १८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात देखील पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात सरासरी पाऊस होईल, असं अपेक्षित असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
Continues below advertisement