Maharashtra Rain Update : पुढचे तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान विभागाचा रेन अलर्ट
Maharashtra Rains : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोराचा पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा (Marathwada ) आणि विदर्भात (Vidarbha) पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. तसेच लातूर, औरंगाबाद, जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुढील तीन दिवस हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.