TOP 100 Headlines : 10 AM : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 21 OCT 2025 : ABP Majha
Continues below advertisement
राज्याच्या राजकारणात मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील आमदार संख्याबळावरून केलेल्या दाव्याने खळबळ उडवली आहे. 'आता बेचाळीस आमदार असले तरी जवळपास पन्नास आमदार अजित पवारांच्या विचारांचे आहेत', असे वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. दुसरीकडे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत मतभेद उघड झाले असून, बैठकांमध्ये भाजपकडून होणाऱ्या त्रासामुळे शिंदे गटाचे नेते नाराज असल्याची माहिती आहे. दरम्यान, राज्याच्या विकासाला दिशा देण्यासाठी 'व्हिजन डॉक्युमेंट २०४७' च्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ३४६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असली तरी, तो खात्यात कधी जमा होणार याबाबत स्पष्टता नाही. तसेच, सोलापुरात राजकीय घडामोडींना वेग आला असून, ठाकरे गटाचे माजी आमदार दीपक साळुंखे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement