Maharashtra Politics | Eknath Shinde दिल्लीत,सह्याद्रीवर Devendra Fadnavis-Ajit Pawar यांच्या बैठका!
राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री Eknath Shinde दिल्लीमध्ये गेले आहेत. तर, राज्यामध्ये मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. मुख्यमंत्री Fadnavis यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर Ajit Pawar यांनी सकाळी मुख्यमंत्री Fadnavis यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर Sunil Tatkare आणि मुख्यमंत्री Fadnavis यांच्यात चर्चा झाली. याच भेटीदरम्यान Dhananjay Munde देखील सह्याद्रीवर पोहोचले. या तिघांच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा Ajit Pawar यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. Dhananjay Munde यांनी सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळात परत येण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याची चर्चा आहे. या भेटीगाठींचा नेमका अर्थ काय आणि येणाऱ्या काळात कोणते निर्णय होणार, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.