MNS Politics: मुंबईत काँग्रेस एकला चलो रे, नाशकात मनसेची वेगळी वाट?
Continues below advertisement
राज्याच्या राजकारणात आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. 'मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार, आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचाय', असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, नाशिक महानगरपालिकेत मनसे महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा होती, मात्र ताज्या रिपोर्ट्सनुसार काँग्रेसने मनसेसोबत युती करण्याची शक्यता फेटाळली आहे. उलट, नाशिकमध्ये मनसे स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचे संकेत मिळत आहेत, ज्यामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement