Mahararashtra Politicsगरज सरो अन् वैद्य मरो,बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल,कार्यालय रद्द केल्याने वाद

Continues below advertisement
राज्याच्या राजकारणात सध्या बच्चू कडू (Bachchu Kadu), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील कार्यालय वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. 'भाजपचं नेचर, गरज सरो आणि वैद्य मरो असं आहे', अशी थेट टीका बच्चू कडू यांनी केली आहे. एकनाथ शिंदे सरकारने बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला मंत्रालयाजवळील जनता दल सेक्युलर पक्षाची जागा कमी करून कार्यालय उपलब्ध करून दिले होते. मात्र, आताच्या सरकारने हा निर्णय रद्द केल्याने बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. जीवन विमा मार्गावरील ९०९ चौरस फूट जागेपैकी ७०० चौरस फूट जागा प्रहारला देण्यात आली होती, जो निर्णय आता फिरवण्यात आला आहे. हा निर्णय अन्यायकारक असून याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola