Maharashtra Politics | मनसेत दिवाळी, माझ्या घरी अंधार: प्रकाश महाजन यांची खंत
मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन इगतपुरी येथील तीन दिवसीय शिबिरात आमंत्रित न केल्याने नाराज झाले आहेत. "मनसेत दिवाळी आहे, माझ्या घरात अंधार आहे," अशा शब्दांत त्यांनी आपली खंत व्यक्त केली. देव बदलणार नाही, पण देवाने बोलावल्याशिवाय देवळात जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत तर महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे. तसेच, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती व्हावी, अशी वैभव खेडेकर यांची मागणी आहे. या नेत्यांना इगतपुरी शिबिरात न बोलावण्यामागे युतीचा आग्रह हे कारण आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, विधानसभेत मंत्री शंभूराज देसाई आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे वरुण सरदेसाई यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या खडाजंगीत आदित्य ठाकरेंसह पक्षाचे आमदार आक्रमक झाले, तर शिंदे गटाच्या आमदारांनीही प्रत्युत्तर दिले.