Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीविना काम करणाऱ्या खाजगी सचिवांवर कारवाई
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या परवानगीशिवाय काम करणाऱ्या मंत्र्यांच्या खाजगी सचिवांना सामान्य प्रशासन विभागाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. सुमारे तेहतीस अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस खाजगी सचिव आणि ओएसडीला मंजुरी देत नसल्याने अनेक मंत्र्यांनी तक्रारी केल्या आहेत. या परिस्थितीमुळे जवळपास अर्धा डझन मंत्री अडचणीत सापडले आहेत.