CBSE Board Exam Twice a Year | सीबीएसई दहावीची परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात; २०२६ पासून सुरुवात
सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २०२६ पासून दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाईल. फेब्रुवारीत होणारी परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असेल, तर मे मधील परीक्षा ऐच्छिक असेल. मे महिन्यातील परीक्षा ग्रेड सुधारणा किंवा टक्केवारी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आपले गुण सुधारण्याची संधी मिळणार आहे.