Maharashtra Police Transfer : राज्यात IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे - नागपूरचे नवे पोलीस आयुक्त कोण?
Continues below advertisement
राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नागपूरचे सध्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली होऊन ते पुण्यात आयुक्तपदी येत आहेत. तर नागपूरच्या आयुक्तपदी रविंद सिंघल येत आहेत. परभणीच्या पोलीस अधीक्षकपदी रविंद्रसिंह परदेशी यांची बदली झालीय. तर जालन्याचे विद्यमान प्रभारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची पदोन्नती होऊन ते पुण्यात अप्पर पोलीस आयुक्तपदी जात आहेत. जालन्यात पोलीस अधीक्षकपदी अजयकुमार बन्सल यांची नियुक्ती झालीय.
Continues below advertisement