ABP News

Maharahstra : सर्व पोलीस ठाण्यांमधील पोलीस कोठडीत सीसीटीव्हीची नजर ABP Majha

Continues below advertisement

राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांमधील पोलीस कोठडीत सीसीटीव्हीची नजर असणार आहे.  राज्यातील एकूण १०८९ पोलीस ठाण्यांपैकी ५४७ म्हणजे ५० टक्के पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. पोलीस कोठडीतील मृत्यू आणि मारामारीच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही बसवले जात आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यामधील कॉरिडॉर, रूम आणि लॉकअपमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी २३ कोटी ४५ लाख ६५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram