Voter List Row: 'निवडणूक आयोगाचा Server दुसराच कुणीतरी चालवतो'; Jayant Patil यांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी मतदार यादीतील (Voter List) गंभीर त्रुटींवरून निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil), काँग्रेसचे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक धक्कादायक पुरावे सादर केले. 'राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतोय, असा आमचा अनुभव व्हायला लागला आहे', असा खळबळजनक आरोप जयंत पाटील यांनी केला. मुरबाडमध्ये एकाच घरात ४०० मतदार, पुणे कँटोन्मेंटमध्ये एकाच पत्त्यावर ८६९ मतदार आणि नाशिकमध्ये ८१३ मतदारांची नोंद असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. वडिलांचे वय ४३ तर मुलीचे वय १२४ असल्याच्या विचित्र नोंदी राज ठाकरे यांनी उघड केल्या. जोपर्यंत या बोगस आणि सदोष मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी एकमुखी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement