Highway Traffic Jam: महामार्गावर वाहतुकीचा कहर, ५०० विद्यार्थी १२ तास अडकले.

Continues below advertisement
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) घोडबंदर (Ghodbunder) येथील रस्त्याच्या कामामुळे सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडीचा प्रचंड मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागला. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या शाळकरी मुलांच्या पालकांनी, 'आमची मुलं तासनतास असहाय्य होती, पोलीस नव्हते, माहिती नव्हती, कोणतीही यंत्रणा नव्हती,' असा संतप्त सवाल केला. या अभूतपूर्व वाहतूक कोंडीत दादरची शारदाश्रम शाळा आणि मालाडच्या शाळेच्या १२ बसेस अडकल्या होत्या, ज्यात ५०० हून अधिक विद्यार्थी होते. हे विद्यार्थी जवळपास १२ तास अडकून पडले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रशासनाला फोन केल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आणि मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. रुग्णवाहिका आणि भाजीपाल्यासारख्या अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहनेही या कोंडीत अडकल्याचे चित्र होते. ठाणे ते घोडबंदर दरम्यानच्या गायमुख (Gaimukh) परिसरातील डांबरीकरणाचे काम नियोजित वेळेपेक्षा उशिरा संपल्याने ही परिस्थिती उद्भवली. मुंबईहून गुजरातकडे जाणारी लेन पूर्णपणे ठप्प झाली होती, मात्र आता वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola