
Maharashtra Onion : आता नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्रात कांदा विक्री होणार नाही : ABP Majha
Continues below advertisement
आता नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्रात कांदा विक्री होणार नाहीये. तसंच नेपाळमधून महाराष्ट्रात कांदा आयातही केला जाणार नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी एबीपी माझाला दिलीय. कांद्यांचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेडच्या माध्यमातून कांदा विक्री केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने राजकारण तापलं होतं. या सगळ्यामध्ये विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप भारती पवार यांनी केलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी.
Continues below advertisement