Maharashtra Omicron Case : डोंबिवलीत सापडला एक रुग्ण, मुंबईकरांची चिंता वाढली ABP Majha

Continues below advertisement

महाराष्ट्रात आता ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय... मुंबईनजीकच्या कल्याण डोंबिवलीत ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेला पहिला रुग्ण आढळलाय... दक्षिण आफ्रिकेहून आलेला हा ३३ वर्षीय तरुण असून दुबई, दिल्ली मार्गे हा तरुण २४ नोव्हेंबरला महाराष्ट्रात म्हणजेच मुंबईत दाखल झाला होता... विमानतळावर केलेल्या तपासणीत त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याचे नमुने जिमोन सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. या तपासणीचा अहवाल आला असून तो ओमायक्रॉन बाधित असल्याचे समोर आलंय. ओमायक्रॉनबाधित या तरुणाने कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस घेतला नसल्याचीही माहिती समोर आलीय. हा तरुण ३५ जणांच्या संपर्कात होता आणि त्या सगळ्यांची तपासणी पूर्ण झालीय. 
त्यामुळे आता कर्नाटक, गुजरातपाठोपाठ महाराष्ट्रातही ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय... देशभरात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा आता चारवर पोहोचलाय... 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram