Olympic Association: 'निवडणुकीकडे राजकीय दृष्टीने पाहू नये', Murlidhar Mohol यांचे स्पष्टीकरण
Continues below advertisement
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (Maharashtra Olympic Association) अध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला असून, अजित पवार (Ajit Pawar) आणि मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यात समझोता झाला आहे. 'याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पद्धतीनं ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणूकीकडे पाहू नये,' असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मध्यस्थीनंतर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार, अध्यक्षपद अजित पवार यांना तर वरिष्ठ उपाध्यक्षपद मुरलीधर मोहोळ यांना देण्याचे ठरले आहे. अजित पवार यांना संपूर्ण कार्यकारिणी निवडण्याचे सर्वाधिकार देण्यात आले असून, ते आज नव्या सदस्यांची नावे जाहीर करतील. शनिवारी रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय निश्चित झाला. या घडामोडींमुळे क्रीडा वर्तुळातील संघर्ष टळला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement