BMC Elections: 'महायुतीचा महापौर निवडून आल्यानंतर जाहीरनामा अमलात आणू', भाजपचे आश्वासन
Continues below advertisement
मुंबईत भाजपकडून 'आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपाचा' ही मोहीम सुरू करण्यात आली असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते मतदारांशी संवाद साधत आहेत. या मोहिमेअंतर्गत सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. 'जो जाहीरनामा तयार होईल, तो येणाऱ्या काळात महायुतीचा महापौर निवडून आल्यानंतर अमलात आणला जाईल,' असे भाजपने म्हटले आहे. तीन दिवस चालणाऱ्या 'घर चलो' अभियानाद्वारे भाजप कार्यकर्ते मुंबईकरांच्या घरी जाऊन शहरासाठी त्यांच्या सूचना नोंदवून घेत आहेत. याच सूचनांच्या आधारे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार केला जाणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement