Murlidhar Mohol - Ajit Pawar : ऑलिंपिक असोसिएशन निवडणूक तिढा अखेर सुटला,अजितदादांची एकमुखानं निवड

Continues below advertisement
महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन (MOA) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यात सामोपचाराने तोडगा निघाला आहे. 'अध्यक्ष म्हणून समान कालावधी दोघांनाही मिळेल, दादा असतील किंवा मी असेल,' असे मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले. या नव्या फॉर्म्युल्यानुसार, अजित पवार पहिली दोन वर्षे अध्यक्ष राहतील, तर त्यानंतरची दोन वर्षे मुरलीधर मोहोळ अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या तडजोडीत अजित पवार यांच्या गटाला १०, तर मोहोळ गटाला ११ जागा मिळाल्या असून, खजिनदार आणि सचिवपदही मोहोळ गटाकडे गेले आहे. गेल्या ३० वर्षांपासून असोसिएशनवर एकहाती वर्चस्व असलेल्या अजित पवारांना भाजपसोबतच्या (BJP) युतीत ही मोठी राजकीय तडजोड करावी लागली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola