Local Body Election: '15 जानेवारीला मतदान', दिलीप वळसे पाटलांनी निवडणूक आयोगाआधीच तारखा जाहीर केल्या
Continues below advertisement
राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून राजकीय वातावरण तापले आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी थेट तारखा जाहीर केल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. 'माझ्या माहितीप्रमाणे साधारणपणे १५ डिसेंबरला जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान होईल आणि १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीचे मतदान होईल,' असा दावा दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत घोषणेपूर्वीच वळसे पाटील यांनी तारखा सांगितल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यात सुमारे चार-पाच वर्षांपासून निवडणुका रखडल्या असून, पहिल्या टप्प्यात २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (२४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायती) निवडणुका होण्याची शक्यता आहे. यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि शेवटी महापालिकांच्या निवडणुका पार पडतील, असे संकेत मिळत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement