Maharashtra Old Pension Strike : दिवस चौथा, प्रशासकीय गाडा रुतला, जनतेची कामं रखडली

Continues below advertisement

सरकारी कर्मचाऱ्यांनी संपातून सामान्य जनतेला वेठीस धरल्याचा आजचा चौथा दिवस. जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी मंगळवारपासून संपावर आहेत. सरकारनं मेस्मा अंतर्गत नोटिसा बजावूनही हे कर्मचारी कामावर परत येत नाहीयेत. त्यामुळे केवळ नोटिसा नको, या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, त्यांचं निलंबन करण्यास सुरुवात करा, अशी मागणी आता सामान्य नागरिक करू लागले आहेत. एकीकडे रुग्णालयांमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे आतोनात हाल होतायेत, तर दुसरीकडे कुठल्याही सरकारी कार्यालयात जनतेची कामं होत नाहीयेत. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीवर सरकारनं अभ्यास समिती गठीत केली. स्वतः मुख्यमंत्र्यांनी यावर सभागृहात निवेदन केलं.. तरीही कर्मचारी ऐकत नाहीयेत. आणि म्हणूनच, आता या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचला अशी संतप्त भावना आता सामान्य नागरिक करू लागले आहेत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram