Corona vaccination : देशात आज कोरोना लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण होण्याची शक्यता
देशाच्या कोरोना विरोधातल्या लढाईसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात कोरोना लसीचे 99 कोटीहून अधिक डोस देण्यात आले असून आज ऐतिहासिक 100 कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 100 कोटी लसींचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी सुद्धा केली आहे.