Maharashtra New CM :मुख्यमंत्रिपदाच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब,विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणार
Continues below advertisement
Maharashtra New CM :मुख्यमंत्रिपदाच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब,विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणार
अखेर मुख्यमंत्री कोण होणार याचा फैसला आज होणार आहे. भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची आज मुंबईत निवड होईल. आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप आमदार आपला विधिमंडळ पक्षनेत्याच्या नावावर मोहोर उमटवतील. विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये ही बैठक होणार आहे. विधान भवनाच्या प्रवेशद्वाराला फुलांची सजावट करण्यात आलीय.
देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होईल अशीच चर्चा आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस विराजमान होतील हे जवळपास निश्चित आहे.
Continues below advertisement