Maharashtra NCP Crisis : दोघेही आशावादी राष्ट्रवादी कुणाची ? काकांची की पुतण्याची ? : ABP Majha

Continues below advertisement

गेल्या वर्षभरापासून उभ्या महाराष्ट्रानं दोन शिवसेनेतला वाद पाहिला.... दोन पदं... दोन नियुक्त्या आणि परस्पर कारवाया पाहिल्या... पण आता याच नाट्याचा भाग दोन पाहायला मिळतोय... पण आता पक्ष शिवसेना नसून पक्ष राष्ट्रवादी आहे.... घटनाक्रम अगदी तंतोतंत सुरु आहे... जे आधी घडलं तेच आत्ता घडतंय... आधी लढाई ठाकरे विरुद्ध शिंदेंची होती... आणि आता लढाई दोन पवारांमध्ये आहे.... एक शरद पवार गट आणि दुसरा अजित पवार गट एकमेकांसमोर उभा ठाकलाय.... अजित पवार गटातील मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 9 नेत्यांवर अपात्रतेची कारवाई केलीए... शिवाय सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना तर शरद पवारांनी पक्षातून ब़डतर्फ केलंय. तर दुसरीकडे अजित पवार गटानं जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनवरच कारवाई केलीए... दादा गटानं नव्या नियुक्त्याही जाहीर केल्यात... प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटलांना पदमुक्त करत सुनील तटकरेंकडे जबाबदारी दिलीए... तर शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांकडे दिलेली विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून अजितदादांनी आव्हाडांना अपात्र ठरवलंय.... त्यामुळे आता कुठल्या पक्षाच्या नियुक्त्या अधिकृत आणि मुळात पक्षावर कुणाचा दावा अधिकृत हाच मोठा प्रश्न कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांपुढे आहे... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram