Nanded Earthquake : नांदेड, हिंगोलीत भूकंपाचे धक्के; घाबरुन न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन

नांदेड : नांदेड शहरासह परिसरामध्ये सौम्य भूकंपाच्या धक्क्यासह जमिनीतून गूढ आवाज आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नांदेड शहरातील फरांदे नगर, छत्रपती चौक, तरोडा नाका, स्नेहनगर व जिल्ह्यातील अर्धापुर, हदगाव, मालेगाव ,मुदखेड, हिमायतनगर परिसरात रविवारी सकाळी 8 वाजून 32 मिनिटांनी व 8:42 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले.  शहरासह जिल्हाभरात बसलेल्या ह्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे घरातील भांडीकुंडी, पलंग, खुर्च्या हादरत होत्या असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलंय. तर अर्धापूर तालुक्यातही भूकंपामुळे घरावरील पत्रे हलल्यामुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले.  या भूकंपाचं केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात असून त्याठिकाणी या भूकंपाची 4.4 रिष्टर स्केलची नोंद करण्यात आलीय. तर नांदेड जिल्ह्यातील भूकंपाचे बसलेले धक्के किती रिष्टर स्केलचे होते याची माहिती घेण्याचा प्रयत्न स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे डॉ. टी. विजयकुमार हे करत आहेत.यात दोन्ही भूकंपाची वेळ एकच असल्याने माहिती मिळण्यास अडचण येऊन वेळ लागत असल्याची माहिती डॉ.विजयकुमार यांनी दिलीय.त्यामुळे याविषयी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात नांदेड जिल्ह्यातील ह्या भूकंपाची तीव्रता  अथवा रिष्टर स्केल किती होती हे तपासणे सुरू आहे. तर नागरिकांनो घाबरून जाऊ नका असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी केलेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola