Maharashtra Nagpur Adhiveshan : 20 मंत्री असतानाही 40 बंगल्यांची तयारी
abp majha web team
Updated at:
02 Dec 2022 03:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?, याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले असतानाच, आता नागपुरातून एक मोठी घडामोड समोर येतीय. नागपुरात हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू असून, मंत्र्यांसाठी ४० बंगले सज्ज करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि १८ कॅबिनेट असे २० मंत्री असताना, ४० बंगले सज्ज केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हिवाळी अधिवेशनाआधी किंवा अधिवेशन सुरू असतानाच मंत्रिमंडळ विस्तार होतोय की काय?, अशाही चर्चा आता रंगल्या आहेत. जिथं हे बंगले सज्ज केले जातायत, थेट तिथूनच आढावा घेतलाय, आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ...