Maharashtra Monsoon News : तुमच्या जिल्ह्यातील पावसाच्या बातम्या एका क्लिकवर : 11 जून 2024

Continues below advertisement

Maharashtra Monsoon News : तुमच्या जिल्ह्यातील पावसाच्या बातम्या एका क्लिकवर : 11 जून 2024

अमरावतीत पावसाची दमदार हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. पाऊस आल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आता दमदार पावसाची प्रतीक्षा.

कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नालेसफाईचा दावा केला असला तरी, काही नाले ओसंडून वाहताना दिसून येत आहेत. न्यू गोविंदवाडी परिसरातील नाल्याचे पाणी रस्त्यावर.

मराठवाड्यात दमदार पाऊस, बीडमधील लेंडी नदीला पूर तर जालन्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरुप, लातुरात पर्यायी रस्ता वाहून गेल्याने लातूर-उदगीर मार्ग बंद

सोलापूर जिल्ह्यात मागील सहा दिवसापासून सर्वदूर पाऊस आहे. जून महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस मागील आठवडाभरात झाल्याने बळीराजा आनंदी आहे. खरीप पिकासाठी या पावसाचा फायदा होणार आहे. एकीकडे हा पाऊस आनंद जरी देत असला दुसरीकडे याच पावसाचा फटका देखील अनेक शेतकऱ्यांना बसलाय. मोहोळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्ष, डाळिंब, टरबूज, केळी इत्यादी फळ पिकांना या मुसळधार पावसाचा फटका बसलाय. मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी गावातील टरबूज उत्पादक शेतकऱ्याचे या पावसामुळे लाखोचे नुकसान झाले आहे. दादासाहेब भोसले असे या शेतकऱ्याचे नाव आहे. भोसले यांनी आपल्या अडीच एकर शेतात 5 लाख खर्चून एक्सपोर्ट दर्जाचे टरबूज पीक घेतले होते. मात्र हे पीक आता जमीनदोस्त झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे टरबूज पीक हे नुकसान भरपाईच्या निकषात बसत नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा या शेतकऱ्याने केलाय. त्यामुळे हे शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram