Maharashtra Monsoon News : पावसाच्या बातम्या एका क्लिकवर : 11 जून 2024

Continues below advertisement

मराठवाड्याच्या धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील रामलिंग धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित. पर्यटकांची पावले रामलिंग धबधब्याकडे. 

महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस. अचानक सुरू झालेल्या पावसानं पर्यटकांची उडाली तारांबळ.

गोंदियात पावसाची दडी , जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा 40 अंशावर, उकाडा वाढल्याने नागरिक हैराण, बळीराजालाही चांगल्या पावसाची प्रतिक्षा.  

अमरावतीत पावसाची दमदार हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. पाऊस आल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आता दमदार पावसाची प्रतीक्षा.

मनमाड शहर आणि परिसरात पावसाची पुन्हा हजेरी. पावसामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत. टंचाईग्रस्त मनमाडकरांना काहीसा दिलासा. हा पाऊस शेतीसाठी फायदेशीर असल्यानं शेतकऱ्यांनी व्यक्त केलं समाधान.

संगमनेर तालुक्यासह परिसरात पावसाची जोरदार हजेरी. पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजाला दिलासा. मात्र जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी. घरात गुडघाभर पाणी साचल्यानं अनेकांची धावपळ.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram