Maharashtra Monsoon : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला अलर्ट
Continues below advertisement
Maharashtra Mumbai Rain Updates : राज्यभरात पावसानं (Rain Updates) धुमाकूळ घातला असला तरी मुंबईत मात्र कालपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. पण काही काळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हवामान खात्याकडून मुंबईला पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता. पण, आठवड्याच्या शेवटी मात्र पावसानं विश्रांती घेतली आहे. गेल्या आठवड्यात कोसळलेल्या पावसामुळं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांतील पाणी पातळी वाढली असून मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाची पातळी आता आवश्यकतेच्या 82 टक्के इतकी आहे, तर तीन तलावही ओसंडून वाहत आहेत.
Continues below advertisement