Maharashtra Flash Flood : महाराष्ट्रात पुढच्या 36 तासांत अनेक ठिकाणी 'फ्लॅश फ्लड'चा इशारा
महाराष्ट्रात पुढच्या 36 तासांत अनेक ठिकाणी 'फ्लॅश फ्लड'चा इशारा, कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अल्पावधीत अतिवृष्टीता इशारा देण्यात आला आहे. रात्रीपासून कोकणात सर्वदूर मुसळधारपाऊस पडतो आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक भागात पाणी साचलं आहे.