Maharashtra Monsoon : Yavatmal जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस,नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
यवतमाळ जिल्ह्यात सध्या तूफान पाऊस बरसतोय. यवतमाळ जिल्ह्यातल्या दराटी गावात नाल्याचं पाणी शिरलंय. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. जवळपास सर्वच नदी-नाले भरून वाहत आहेत. पैनगंगा नदी सुध्दा दुथळी भरून वाहतेय. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. उमरखेड तालुक्यातील दराटी या गावाला नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याने वेडा घातल्याने संपुर्ण गावात पाणी शिरलंय.