Monsoon Maharashtra Alert : पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
Continues below advertisement
येत्या 3 दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. त्यातही विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानं विदर्भात पूरस्थिती होती.. अजूनही काही गावात परिस्थिती बिकट आहे.. अशात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालण्याची शक्यता असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
Continues below advertisement