Electricity : महाराष्ट्रात वीज निर्मीतीचं मोठं संकट, लोडशेडींग वाढण्याची शक्यता ABP Majha

राज्यात वीज निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्य लोड शेडिंगच्या दिशेने निघाले आहे. राज्यातील अनेक वीज निर्मीती केंद्रावर दोन ते तीन दिवस कोळसा पुरेल एवढाच साठा उपलब्ध आहे. देशात यावर्षीही कोळशाचे संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उन्हाळा सुरू झाला असून अशा परिस्थितीत विजेची मागणी वाढली आहे. येत्या काळात विजेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तिकडे बीड जिल्ह्यातील नागरिकांना भारनियमनाचा शॉक दिला आहे. विजेची वाढलेली मागणी आणि कोळशाचा तुटवडा यामुळे बीड जिल्ह्यात आपत्कालीन भारनियमन सुरु करण्यात आले... बीड जिल्ह्यातील फिडरवर सहा ते आठ तासांचे चक्री भारनियमन करण्यात येत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola