Maharashtra Loksabha Vidhansabha Elections:लोकसभा,विधानसभा निवडणुका एकत्र?महाराष्ट्र भाजपचा प्रस्ताव
आता एक अतिशय मोठी राजकीय बातमी.. द हिंदू या वर्तमानपत्राने महाराष्ट्रा संदर्भात मोठी बातमी दिली आहे. भाजपाचे केंद्रीय नेतृत्व पुढील वर्षी एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसोबत विधानसभा निवडणूकही घेण्याच्या विचारात आहे. तसा प्रस्ताव प्रदेश भाजपानेच दिल्याचा बातमीत उल्लेख आहे. महाविकास आघाडी स्थापन केलेल्या विरोधी पक्षांच्या युती आणि शिवसेना पक्षात झालेली फुट यामुळे प्रदेश भाजपाने तसा प्रस्ताव दिला आहे. पक्षाच्या प्रदेश नेत्तवाला असे वाटते आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत नुकत्याच स्थापन झालेल्या युतीच्या अंतर्गत कारभाराचा मतदारांना सकारात्मक परिणाम होण्यात थोडा वेळ लागू शकतो. विधानसभा निवडणुकीची वेळ सार्वत्रिक निवडणुका घेतल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आणि राष्ट्रीय मुद्दे देखील मतदारांना प्रभाव टाकतील. महाराष्ट्र भाजपनं दिलेल्या प्रस्तावावर केंद्रीय नेतृत्व सध्या विचार करत आहे.