Maharashtra Politics: जय पवारांची राजकारणात एन्ट्री? बारामतीमधून उमेदवारीची शक्यता
Continues below advertisement
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे बारामती नगरपरिषदेतून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 'अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कोणाला कँडिडेट द्यायचं, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे,' अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यावर दिली आहे. आज दुपारी चार वाजता राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुका तीन टप्प्यांत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जय पवार यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे पवार कुटुंबातील राजकीय समीकरणांकडे आणि अजित पवारांच्या या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पार्थ पवार यांच्या पराभवानंतर, जय पवार यांना थेट ग्राऊंड लेव्हलच्या राजकारणातून संधी देण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement