Local Body Polls : '14 तारखेपर्यंत स्थिती स्पष्ट करा', Nagpur मध्ये BJP ला शिवसेनेचा इशारा
Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. कणकवलीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटासोबतच्या आघाडीला विरोध दर्शवला आहे, तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या पुढाकाराने दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshavardhan Sapkal) यांनी मनसेसोबतच्या आघाडीची शक्यता फेटाळली आहे. नागपूरमध्ये भाजपला (BJP) वगळून महायुतीच्या इतर पक्षांनी बैठक घेतली, आणि 'चौदा तारखेपर्यंत भाजपनं स्थिती स्पष्ट करावी अन्यथा महायुतीच्या स्वरुपात आम्ही भाजप वगळून तयारी करू', असा थेट इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement