Maha Politics: 'ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत
Continues below advertisement
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 'ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये भाजप स्वबळावरती लढेल,' असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान दिले आहेत. या घोषणेमुळे महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ज्या ठिकाणी मित्र पक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत, तिथे स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचार भाजप करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र, दुसरीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये महायुती म्हणूनच एकत्र निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे भाजपची ही दुहेरी रणनीती आगामी निवडणुकीत काय परिणाम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement