Dhurla Nivdnukicha : राष्ट्रवादीतील भिंत कोसळणार? दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत

Continues below advertisement
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे भाजप नेते प्रदीप पडोळे यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि बदललेल्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राजीनामा दिला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. प्रदीप पडोळे यांनी, 'खूप प्रेशरमध्ये काम करावं लागतं, भारतीय जनता पार्टीची विचारधारा आता बदलली आहे,' असा गंभीर आरोप केला आहे. यासोबतच, उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासोबत युती न करण्याचे आदेश दिले असतानाही, ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवलीत दोन्ही शिवसेना गट एकत्र येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, रोहित पवारांच्या सूचक विधानानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच होईल, अशी भूमिका अजित पवार गटाने घेतल्याने पवार काका-पुतणे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola