Dhananjay Munde PC : माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप, मुंडेंनी थेट नार्को टेस्टचीच मागणी केली

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे-पाटील यांनी केलेले हत्येच्या कटाचे आरोप फेटाळून लावले आहेत. 'माझ्या मनात पाप असेल, तर माझी ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, पण माझ्यासोबत जरांगे आणि अटक केलेल्या आरोपींचीही करा, म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी होईल', असे थेट आव्हान धनंजय मुंडे यांनी दिले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी राज्य पोलिसांनी न करता थेट सीबीआयने (CBI) करावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आपली प्रामाणिक भूमिका आहे, मात्र केवळ एका सभेतील दोन प्रश्नांमुळे आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. आपण गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय असल्याचेही त्यांनी पुरावे देऊन स्पष्ट केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola