Maharashtra Local Body Elections: 32 जिल्हा परिषदा, 336 पंचायत समित्यांची मतदार यादी रखडली
Continues below advertisement
जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समित्यांच्या (Panchayat Samiti) अंतिम मतदार यादी प्रसिद्धीच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) दिलेल्या माहितीनुसार, आता ही यादी १२ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. 'मतदार याद्यांमधील दुबार नावं डिलीट करण्याच्या आयोगाने सूचना दिल्या आहेत'. या निर्णयामुळे राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होणार आहे. पूर्वी ही मुदत २७ ऑक्टोबर होती, मात्र मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम बाकी असल्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. दुबार नावे वगळून अचूक मतदार यादी तयार करण्याचे स्पष्ट निर्देश आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement