Voter List Politics: 'मतदार याद्यांमधले घोळ लोकांच्या समोर ठेवले आहेत', सरिता कौशिक यांचा निर्वाळा

Continues below advertisement
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून राजकारण तापले आहे. एबीपीच्या संपादिका सरिता कौशिक यांनी मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी आणि विरोधकांच्या भूमिकेवर विश्लेषण केले. कौशिक यांच्या मते, 'निवडणुका घेण्यामध्ये कुठलंही अडचणी येणार नाही'. न्यायालयात याचिका दाखल करण्यास उशीर झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी मतदार याद्यांमधील घोळाचा मुद्दा उचलून धरत थेट दिल्लीत धाव घेतली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने 'आता का आलात?' असा प्रश्न उपस्थित केल्याने विरोधकांची कोंडी झाली आहे. मराठवाड्यातील मराठा विरुद्ध वंजारी संघर्ष, राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा आणि विविध नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने या निवडणुका अधिकच चुरशीच्या होणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola