Duplicate Voters : 'तुम्हाला दुबार मतदार केवळ Hindu-मराठीच दिसतात का?', Ashish Shelar यांचा Raj Thackeray यांना सवाल.

Continues below advertisement
राज्यात दुबार मतदारांच्या (Duplicate Voters) मुद्द्यावरून भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि मनसे (MNS) यांच्यात नवा वाद पेटला आहे. 'तुम्हाला दुबार मतदार केवळ हिंदू आणि मराठी माणूसच दिसतो का?', असा थेट सवाल आशिष शेलार यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पत्रकार परिषदेत केला. शेलार यांनी आरोप केला की, विरोधक केवळ पाटील आणि भोईर यांसारख्या आडनावांवरून हिंदू मतदारांना लक्ष्य करत आहेत, मात्र मुस्लिम दुबार मतदारांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. यावर प्रत्युत्तर देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले की, आशिष शेलार frustated (वैफल्यग्रस्त) असून केवळ चर्चेत राहण्यासाठी अशी वक्तव्ये करत आहेत. आम्ही सर्वच दुबार मतदारांवर आक्षेप घेत आहोत, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले. शेलार यांनी 'Justice for all, appeasement for none' या भाजपच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola