Matoshree Drone Row: 'ड्रोन कुणाच्या परवानगीने?', Aditya Thackeray यांचा सवाल
Continues below advertisement
मातोश्री (Matoshree) परिसरात ड्रोन उडवल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 'मातोश्री परिसरामध्ये कुणाच्याही परवानगीनं ड्रोन उडवण्यात आले?' असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) खुलासा करत, एमएमआरडीएने (MMRDA) पॉड टॅक्सीच्या (Pod Taxi) सर्वेक्षणासाठी परवानगी घेऊनच खेरवाडी आणि बीकेसी (BKC) परिसरात ड्रोन उडवल्याचे स्पष्ट केले आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या निवासस्थानामुळे हा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. त्यामुळे परवानगी असली तरी, स्थानिकांना माहिती का दिली नाही, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेने (UBT) सुरक्षेचा मुद्दा कायम ठेवला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement