Maha Civic Polls: '...डबल स्टार म्हणून नोंद होईल', दुबार मतदारांवर निवडणूक आयोगाचा वॉच!

Continues below advertisement
राज्यातल्या बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. 'ज्या मतदाराच्या नावानं पुढे डबल स्टार आलेला आहे...त्याच्याकडून एक डिक्लरेशन घेतल्या जाईल की या मतदान केंद्राव्यतिरिक्त इतर मतदान केंद्रामध्ये त्यांनी मतदान केलं नाही', असे वाघमारे यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होईल आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडेल. उमेदवारी अर्ज १० नोव्हेंबरपासून भरता येणार असून १७ नोव्हेंबर ही अंतिम तारीख असेल. मतदार यादीतील दुबार नावांच्या तक्रारीनंतर, निवडणूक आयोगाने संभाव्य दुबार मतदारांच्या नावापुढे 'डबल स्टार' (Double Star) चिन्ह देण्याची प्रणाली विकसित केली आहे, जेणेकरून एका व्यक्तीला एकाच ठिकाणी मतदान करता येईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola