Maharashtra Politics: निवडणूक आयोग पक्षपाती, मतदार यादीत गोंधळ; Ambadas Danve यांचा घणाघात
Continues below advertisement
विधान परिषदेचे माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणुकांवरून आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या चर्चेत दानवे यांनी मतदार याद्यांमधील गोंधळावर बोट ठेवले. 'मला असं वाटतं निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं घाई करतंय... ही निवडणूक मला असं वाटतं पक्षपाती व्हावी आणि व्हावीत अशाच पद्धतीनं निवडणूक आयोगाचा प्रयत्न दिसतो,' असे स्पष्ट मत दानवे यांनी मांडले. दुबार नावे असलेल्या मतदारांवर कारवाई करण्याऐवजी केवळ स्टार चिन्ह का दिले जात आहे, असा सवाल त्यांनी केला. तसेच, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचे राजकीयकरण होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने खबरदारी घ्यावी, असेही ते म्हणाले. आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडी म्हणून लढायचे की स्वतंत्र, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement