Maharashtra Load shedding : मुंबईलगतचे काही भाग, विदर्भ, मराठवाडा, खान्देशात भारनियम ABP Majha
Continues below advertisement
उन्हाच्या झळांनी हवालदिल झालेल्या महाराष्ट्रातल्या काही भागांना भारनियमनाचा शॉक बसतोय. मात्र आता या भारनियमनाची व्याप्ती वाढणार आहे... आजपासून राज्याच्या विविध भागात भारनियमन होणार असल्याचं महावितरणकडून जाहीर करण्यात आलयं. ज्या भागात वीज चोरी, वीज गळती अधिक आणि जिथे वीजबिल चुकवेगीरी वाढलेय अशा भागात भारनियमन अधिक असणार असं महावितरणकडून सांगण्यात आलंय. राज्यात कोळसा टंचाईमुळे आधीच ३ हजार मेगावॅट वीजेची तूट आहे.. त्यातच उन्हाळ्यामुळे विजेची मागणीही ३० हजार मेगावॅटपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.. त्यामुळे मागणी-पुरवठा व्यवस्थापनासाठी हा भारनियमनाचा शॉक देण्याचा निर्णय महावितरणनं घेतलाय.
Continues below advertisement