Maharashtra- Karnataka border : राजकारण थांबवा आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे लक्ष द्या

Continues below advertisement

महाराष्ट्राची रोजची सकाळ ही राजकारण्यांच्या भांडणानं होते....आरोप-प्रत्यारोप आणि चिखलफेकीनं अख्खा दिवस संपतो.... पण यात महाराष्ट्र भरडला जातोय.. आणि आता याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या सीमेवरील गावांचा संयम सुटतोय.... महाराष्ट्रातली सीमेवरची गावं परराज्यात जाण्याची मागणी करु लागलीत... आणि हे चित्र महाराष्ट्रासाठी विषण्ण करणारं आहे...
महाराष्ट्राच्या सीमाभागापासून ५ किलोमीटर दूर गुजरात कर्नाटक, तेलंगणातील गावांचं चित्र पाहिलं तर फरक स्पष्ट दिसतो. वीज, पाणी, पायाभूत सोयीसुविधा किंवा मग शेतमालाला भाव आणि सवलती काहीही असो, आपल्यापेक्षा कर्नाटक, गुजरात, तेलंगणा अधिक संपन्न असल्याची सीमाभागातील लोकांची भावना आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram