Maharashtra Karnataka Border :महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा दुसरा अंक, कर्नाटकात सामील होण्याच इशारा
महाराष्ट्राची रोजची सकाळ ही राजकारण्यांच्या भांडणानं होते....आरोप-प्रत्यारोप आणि चिखलफेकीनं अख्खा दिवस संपतो.... पण यात महाराष्ट्र भरडला जातोय.. आणि आता याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या सीमेवरील गावांचा संयम सुटतोय.... महाराष्ट्रातली सीमेवरची गावं परराज्यात जाण्याची मागणी करु लागलीत... आणि हे चित्र महाराष्ट्रासाठी विषण्ण करणारं आहे...
महाराष्ट्राच्या सीमाभागापासून ५ किलोमीटर दूर गुजरात कर्नाटक, तेलंगणातील गावांचं चित्र पाहिलं तर फरक स्पष्ट दिसतो. वीज, पाणी, पायाभूत सोयीसुविधा किंवा मग शेतमालाला भाव आणि सवलती काहीही असो, आपल्यापेक्षा कर्नाटक, गुजरात, तेलंगणा अधिक संपन्न असल्याची सीमाभागातील लोकांची भावना आहे.
खरंतर हे लोकांचे रोजचे जगण्यामरण्याचे प्रश्न आहेत. पण याकडं राज्यकर्ते आणि विरोधक दोघांचंही लक्ष आहे का? राजकारणी आरोप-प्रत्यारोपांच्या खेळात अधिक व्यस्त आहेत का ?
आणि म्हणूनच या गावांवर परराज्यात जाण्याच्या मागणीची नामुष्की ओढवलीए का? महाराष्ट्र सोडून इतर राज्यात जाण्याची इच्छा त्यामुळेच व्हावी का? हे प्रश्न आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकारण्यांना विनंती आहे... उघडा डोळे आणि बघा नीट.. राजकारण थांबवा आणि महाराष्ट्रातील प्रश्नांकडे लक्ष द्या....