Maharashtra inflation : महाराष्ट्रात महागाईचा भडका गहू, ज्वारी, बाजरीचे दर 50 रुपयांहून अधिक

Continues below advertisement

महाराष्ट्रात महागाईचा भडका उडाला आहे. किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या गहू, ज्वारी, बाजरीने पन्नाशी ओलांडली आहे. उडीदडाळ, मुगडाळ, तूरडाळ होलसेल मार्केटमध्येच शंभरी पार गेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं किचनचं बजेट बिघडलं आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका धान्य उत्पादनाला बसला आहे. ज्वारी, बाजरी, गहू, डाळी, कडधान्यांच्या किंमती कडाडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीही जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ज्वारीचे दर 22 ते 29 रुपयांवरुन थेट 28 ते 50 रुपयांवर गेलेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram