Maharashtra : सरकारने फी सवलतीचे पैसे न दिल्यास विद्यार्थ्यांना लाखोची फी भरावी लागणार?

Continues below advertisement

आता एबीपी माझाची एक्स्क्लुझिव्ह आणि तेवढीच मोठी बातमी.. खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एससी, एसटी, ओबीसी तसंच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना फीसाठी लाखो रुपये मोजावे लागू शकतात. कारण राज्य सरकारकडून डिसेंबर २०२४ पर्यंत फी सवलतीचे पैसे मिळाले नाही तर,  फीचे संपूर्ण पैसे भरण्याबाबत विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञापत्र घेतलं जातंय.  खरं तर विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे प्रतिज्ञापत्र लिहून घेणं हे शुल्क नियामक प्राधिकरणाच्या आदेशाचं उल्लंघनच म्हणायला हवं. दरम्यान जर सरकारने संबंधित कॉलेजना फी सवलतीचे पैसे दिले नाही तर फीपोटी भरावे लागणारे लाखो रुपये कुठून आणायचे असा यक्ष प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसमोर उभा ठाकलाय. तसंच संबधित कॉलेज प्रशासनाचा सरकारवर भरवसा नाय काय असा देखील प्रश्न उपस्थित होतोय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram